न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

परळीत गुंडाराज… धारधार शस्त्राने एकाची हत्या

बीड/

बीड जिल्ह्यातील परळीमध्ये मध्यरात्री आर्थिक व्यवहाराच्या वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कारभारी नारायण आंधळे असे मृत तरुणाचे नाव आहे. बस स्टँड ते घरणीकर रोडवर असलेल्या वाहन तळाच्या परिसरात रात्री उशिरा दोन जणांनी कारभारी यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या कारभारी यांना तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे, तर दुसरा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे