वाघाचा १३ महिलांवर हल्ला .. हल्ल्यात ४ जणांचा मृत्यू
चंद्रपूर/ प्रतिनिधी
दुर्दैव… चंद्रपुरातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात एका वाघाने १३ महिलांवर हल्ल्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला आहे.
या 13 महिला एकत्र जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अचानक वाघाने महिलांवर हल्ला केला. हल्ला होताच घाबरलेल्या महिला आपले प्राण वाचवण्यासाठी सैरावैरा पळत सुटल्या. जिवाच्या आकांताने त्यांनी मदतीसाठी हाकही मारली, परंतु जंगलात त्यांना कोणतीच मदत मिळणं कठीण होतं. वाघाने काही महिलांवर आक्रमकपणे झडप मारली आणि या हल्ल्यात चार जणींना आपला जीव गमावला. महिलांना बचावाची कोणतीच संधी न देता वाघान सलग हल्ले केले, त्यातच चौघींचा मृत्यू झाल्याची माहिती, प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. कवडूबाई दादाजी मोहुर्ले, अनुबाई दादाजी मोहुर्ले, सुनिता कौशिक मोहुर्ले आणि संगीता संतोष चौधरी अशी मृत पावलेल्या महिलांची नावं आहेत
वाघानेने हल्ला करताच १३ पैकी एक महिला धावत ओरडत गावात आली. मदतीसाठी तिने आरडाओरड करून गावकऱ्यांना गोळा केलं, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. महिलांच्या मदतीसाठी काही गावकरी तिच्यासोबत धावत जंगलात गेले असता चार महिलांचे मृतदेह त्यांना आढळून आले. हल्ल्यानंतर वाघ घनदाट जंगलात धावून गेली. तर इतर महिला सुखरुप असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेबद्दलची माहिती वनविभागाला देण्यात आली असून वनविभाग याचा तपास करत आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. वनविभागाचे अधिकारी वाघाचा शोध घेतल आहे.


