न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या, पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे साळगावकर यांची मागणी

 

​सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सावंतवाडी नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा, यासाठी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले आहे. यासंदर्भात त्यांनी पालकमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे.
​सावंतवाडी नगरपरिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे प्रशासकीय कामांना प्रचंड विलंब होत आहे. तसेच मुख्याधिकाऱ्यांअभावी नगरपालिकेच्या प्रशासनात कोणतीही एकसंघता राहिलेली नाही, असा आरोप साळगावकर यांनी केला आहे. याचा थेट फटका स्थानिक नागरिकांना बसत असून त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
​सध्या शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. या संदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही त्याचे योग्य निवारण केले जात नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी या विषयात स्वतः लक्ष घालून सावंतवाडी नगरपरिषदेला एक सक्षम आणि चांगला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळवून द्यावा, अशी मागणी बबन साळगावकर यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे