सांगलीत प्रेमविवाहानंतर पतीचा स्वभाव बदलला …आई-बापाच्या मदतीने आपल्या पत्नीलाच छळले; पैशांच्या तगाद्याने पूजाने आपले जीवन संपवले
सांगली/ वृत्तसंस्था
पुण्यातील पायल झांबरे प्रकरणाला काही दिवस उलटत नाही तोवर सांगलीतील शिराळा तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इथे प्रेमविवाह केलेल्या एका २४ वर्षीय तरुणीने सासरच्या त्रासाला कंटाळून आपल्याच आयुष्याचा शेवट केला आहे. तिने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत जीवन संपवलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता मोठी कारवाई करत पतीसह सासू आणि सासऱ्याला अटक केली आहे.


