सावंतवाडीत मटका, गुटखा विक्रेत्यांवर एलसीबीची करडी नजर..
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध गुटखा, पानमसाला, मटका आणि गोवा दारू विक्रेत्यांवर सध्या करडी नजर ठेवण्यात येत असल्याने सध्या हे सर्व धंदे करणारे धंदा बंद करून शांत झाले आहेत. सध्या एलसीबीचे काही कर्मचारी लपून छपून अशा धंदे करणा-यांवर करडी नजर ठेवत आहे. सावंतवाडी शहरात गांधी चौक परिसरातील पान टप-यांवर करडी नजर ठेवल्याची चर्चा आहे. मात्र स्थानिक लोकांनाच विचारणा करीत असल्याने ‘ते’ आले असा संदेश सर्वत्र गेला आणि अनेकांनी दुकानेच बंद केलीत.


