न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भोसले तळीकर प्रतिष्ठान कडून ”माणिक मोती ” संगीत मैफिलीचे आयोजन

 

सिंधुदुर्ग  / राजू तावडे 

   विदुषी पद्मश्री माणिक वर्मा जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता निमित्ताने ”माणिक मोती” या विशेष संगीत मैफिलीचे आयोजन स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठानने केले आहे. शनिवार दिनांक १६ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वा. राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्यु. कॉलेज सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले यांची उपस्थिती राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर उपस्थित राहणार आहेत. तर सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक प्रदीप शेवडे, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी, अध्यक्ष शैलेश पई, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गांवकर, शि.प्र. मंडळ, सावंतवाडी उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. माणिक वर्मा यांनी गायलेल्या अजरामर केलेल्या गीतांचा सदाबहार नजराणा या कार्यक्रमात अनुभवता येणार आहे. गायिका मंजिरी धोपेश्वरकर, नूतन परब, वर्षा देवण, सिद्धी परब, समृद्धी सावंत, केतकी सावंत, विधीता केंकरे, मानसी भोसले, पूर्वा धाकोरकर, श्रृती सावंत, सानिका गावडे, ऋचा पिळणकर, सानिका सासोलकर आदी गीतांच सादरीकरण करणार असून साथसंगत निलेश मेस्त्री, किशोर सावंत, सिद्धेश सावंत, संकेत म्हापणकर, साहिल घुबे, समर्थ केळुसकर, मंगेश मेस्त्री, निरज भोसले, मनिष पवार करणार आहेत‌. ध्वनी संयोजन स्मितेश पंडीत तर मैफिलीचे सूत्रसंचालन संजय कात्रे करणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे निरज भोसले व विनायक गांवस यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे