अभिनेत्री अक्षता कांबळी यांना पालकमंत्री ना. राणे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
अभिनेत्री अक्षता कांबळी याना महाराष्ट्र दिनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.
आज १ मे महाराष्ट्र दीन व सिंधुदुर्ग जिल्हा स्थापना दीनाचे औचित्य साधून हा पुरस्कार सिंधुदुर्ग नगरी पोलिस कवायत मैदान येथील समारंभात प्रदान करण्यात आला.
अभिनेत्री अक्षता कांबळी गेली काही वर्षे महिलाना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. महिलांचा आत्मविश्वास वाढवत त्या समाजकार्य करत आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभाग सिंधुदुर्ग यांनी शासनाचा २०२०-२१ चा पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार त्यांना प्रदान केला. यासाठी सर्व स्तरातून कांबळी यांचे अभिनंदन होत आहे. या पुरस्काराने आपली समाजासाठी काम करण्याची जबाबदारी वाढत आहे, असे मनोगत कांबळी यांनी मालवणी भाषेत यावेळी व्यक्त केले. तसेच जिल्हा महिला बाल विकास महाराष्ट्र राज्य शासन अधिकारी व कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले.


