प्रमोद जठार यांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून अभिनंदन
सिंधुदुर्ग / राजू तावडे
भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद जठार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता हि निवडणूक बिनविरोध होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रमोद जठार यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत भाजपा युवा नेते विशाल परब उपस्थित होते. प्रमोद जठार यांच्या होत असलेल्या निवडीमुळे कोकणाला अजून एक नवीन आमदार मिळत आहे. त्यामुळे जनतेत आनंदाचे वातावरण आहे.


