न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नवीन विद्युत ट्रांसफार्मरसाठी करिता कुणकेरीवासियांचे सावंतवाडी येथे उपोषण

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

   कुणकेरी गावात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याबाबत अनेक वेळा वीज वितरणचे लक्ष वेधून हि अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे विज वितरण कंपनीला जाब विचारण्यासाठी कुणकेरी ग्रामस्थांनी MSEB उपविभाग सावंतवाडी येथे आज महाराष्ट्र दिनी उपोषण चालू केले आहे. जोपर्यंत या प्रश्नावर ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच ठेवणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.

कुणकेरी गावात दोनच ट्रांसफार्मर असल्यामुळे या गावाला कमी दाबाने वीज पुरवठा होतो. या गावात विजेच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. कुणकेरी गावात तेरा वाड्यांसाठी दोनच ट्रांसफार्मर आहेत. त्यात लिंगाचीवाडी येथील ट्रान्सफॉर्मर वरून जाणाऱ्या वीज वाहिनीवर सर्वाधिक ग्राहक आहेत. नेहमीच या सात वाड्यांमध्ये कमी दाबाचा वीजपुरवठा होतो. गावात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याबाबत अनेक वेळा वीज वितरणचे लक्ष वेधण्यात आले. अनेक वेळा उपोषण करण्यात आली. गतवर्षी पालकमंत्री नितेश राणे यांच्या जनता दरबारामध्ये हा विषय मंडण्यात आला होता. त्यावेळी आश्वासन देखिल देण्यात आले होते पण, अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही. अधिकाऱ्यांनी गावात येऊन ट्रान्सफॉर्मर बसवणे बाबत सर्वे केला. जमीन मालकाने जागाही उपलब्ध करून दिली. परंतु ट्रान्सफॉर्मरचा अध्याप पत्ताच नाही. यासाठी ग्रामस्थांनी आज उपोषण चालू केले आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मायकल फ्रान्सिस डिसोजा, माजी पंचायत समिती सभापती श्री प्रमोद मोहन सावंत, श्रीमती सोनिया संजय सावंत- सरपंच कुणकेरी, श्री. सुनील दत्ताराम परब -उपसरपंच, श्री. विश्राम सुधाकर सावंत- माजी सरपंच कुणकेरी, श्रीमती राजश्री चव्हाण, सारिका चव्हाण, संतोष चव्हाण, वेदिया सावंत, उज्वला सावंत, कृष्णकांत सावंत, सुरेश सावंत, काव्या सावंत, किरण सावंत, विनायक सावंत, विनोद सावंत, भरत सावंत, नारायण राणे, सखाराम सावंत, महादेव सावंत, मनोज घाटकर, साहिल सावंत उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे