न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बांदा आरोग्य केंद्रात तात्काळ कर्मचारी देण्याची मनसे तालुकाध्यक्षांची पालकमंत्र्याकडे मागणी

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे तत्काळ कर्मचारी भरती करण्यात यावी अशी मागणी मनसेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी आज गुरुवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
बांदा आरोग्य केंद्राच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज सुमारे २०० ते २५० रुग्ण उपचारासाठी येतात. याशिवाय अपघातग्रस्त व इतर आपत्कालीन रुग्णांचीही संख्या मोठ्या प्रमाणात असते. मात्र, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना वेळेवर सेवा मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः शिपाई व महिला आरोग्य सेवकांची पदे रिक्त असल्याने कामकाजावर ताण वाढला आहे असे मिलिंद सावंत यांनी सांगितले.
सध्या चतुर्थ श्रेणीतील एकूण चार पदांपैकी केवळ दोनच पदे भरलेली असून, त्यातील एक कर्मचारी लवकरच सेवानिवृत्त होणार आहे. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी येणार आहे. याचा परिणाम स्वच्छता, शिस्त व दैनंदिन आरोग्यसेवेवर होणार आहे.
या पार्श्वभूमीवर, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान दोन शिपाई व आवश्यक महिला आरोग्य सेवकांची तत्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे