डॉ. भक्ती प्रसाद गावस हिचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
ज्येष्ठ पत्रकार राजू तावडे यांची कन्या डॉ. भक्ती प्रसाद गावस तावडे हिला पीएचडी पदवी प्राप्त झाल्याबद्दल राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. आज गुरुवारी सावंतवाडी येथील शिल्पग्राम सभागृहात सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा आणि पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव समारंभाचे आयोजन केले होते. याप्रसंगी डॉ. भक्ती गावस हिला पालकमंत्री राणे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, भगवत गीता व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले, लखमराजे भोंसले, जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर आदी उपस्थित होते.


