न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मिलाग्रीस हायस्कूलची आस्था लोंढे विभागीय कॅरम स्पर्धेसाठी पात्र; जिल्हास्तरावर मिळवले यश

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

 

सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलची इयत्ता दहावीत शिकणारी विद्यार्थिनीकुमारी आस्था अभिमन्यू लोंढे हिने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सहावा क्रमांक पटकावला आहे. या शानदार यशामुळे आस्थाची आता आगामी विभागीय स्तरावरील कॅरम स्पर्धेसाठी अधिकृत निवड झाली आहे.

आस्थाच्या या क्रीडा क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल मिलाग्रीस प्रशालेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालढाणा यांनी आस्थाला सन्मानित करून तिचे विशेष कौतुक व गौरव केला. आस्थाने मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमी नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विभागीय स्तरावरही आपल्या खेळाची छाप पाडण्यासाठी आस्था कसून सराव करत असून, सर्व स्तरातून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे