न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कोलगाव निरुखे शाळेळा विहिरीसाठी निधी मंजूर

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

  कोलगाव निरुखे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ मधील विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या मार्गावर आहे. शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. पाण्याचे प्रमाण अपुरे असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेत विद्यार्थ्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला.

माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या माध्यमातून शाळेसाठी विहीर बांधण्याकरिता निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकरच पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विहिरीच्या कामामुळे शाळेतील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

या कामासाठी शिवसेना उपतालुकाप्रमुख राकेश पवार, पंचायत समिती सदस्या प्रणाली टिकले, रोहित नाईक, आशिका सावंत, उगवेकर, अभिजित टिळवे, विजय टिळवे, संजय पवार, सुशांत ठाकूर, विवेक टोपले, विदेश धरी, शीतल टिकले, गौरव कडाळकर, मुकेश ठाकूर, युवराज राणे, राजेंद्र निर्गुण, आदेश गावडे, रविकिरण राऊत, नजीर शेख, योगिनी करमळकर, दिलेश जाधव, भैय्या राऊत आदी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे