न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आमदार दीपक केसरकर यांचा मुंबई निवासस्थानी कुटुंबासमवेत वाढदिवस साजरा 

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

    माजी शालेय शिक्षणमंत्री तथा सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुटुंबीयांनी केक कापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या घरगुती सोहळ्याला त्यांच्या पत्नी तथा सावंतवाडीच्या माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर, नातू अर्जुन यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या सावंतवाडी मतदारसंघात विविध सामाजिक व विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांकडून आणि चाहत्यांकडून ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे