न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आमदार केसरकर यांनाआगामी काळात मंत्रीपद मिळावे, जिल्हाप्रमुख संजू परब 

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

      आमदार दीपक केसरकर हे अत्यंत सरळ, साधे आणि कोणाचेही वाईट न चिंतणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी या मतदारसंघाच्या विकासासाठी अफाट काम केले, मात्र त्याचे श्रेय कधीही स्वतःकडे घेतले नाही. त्यांच्यासारखा लोकप्रतिनिधी या मतदारसंघाला मिळणे भाग्य असून, त्यांना आगामी काळात मंत्रीपद मिळावे, अशा शुभेच्छा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दीपक केसरकर यांना वाढदिवसाच्या दिनी दिल्या.

नगरसेवक देव्या सुर्याजी मित्रमंडळ आणि युवा रक्तदाता संघटना, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज सावंतवाडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा शुभारंभ व उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. परब बोलत होते.

याप्रसंगी रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रक्तपेढीचे अधिकारी प्रशांत सातार्डेकर, प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी, अनिल खाडे, गोविंद श्रीरामे, रवीना लोहंबरे आणि प्राची राणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर आणि प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत यांनीही आपले मनोगत व्यक्त करत आमदार केसरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना सावंतवाडी शहरप्रमुख बाबू कुडतरकर, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य तथा आमदार प्रतिनिधी देव्या सुर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, पंचायत समिती सदस्या प्रणाली टिळवे, सुप्रिता धारणकर, भारती परब, पूजा नाईक, शगुप्ता पडवेकर, शितल नाईक, निलम कुमठेकर, राजश्री निर्गुण, विश्वास घाग, गजानन नाटेकर आणि बासीत पडवेकर तसेच शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अनेकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी युवा रक्तदाता संघटनेचे संदीप निवळे, वसंत सावंत, ॲड. प्रसाद नाटेकर, पंकज बिद्रे, क्रिश सावंत, भास्कर आमुणेकर, भगवत पोळ, मेहर पडते आदींसह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे