आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप
सिंधुदुर्ग / राजू तावडे
माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार श्री. दीपक केसरकर यांच्या वाढदिवस सप्ताहानिमित्त सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे आणि मित्रमंडळ यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हा उपक्रम ११ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली येथे पार पडणार आहे. शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटपही करण्यात येणार आहे.
या आरोग्य उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


