सांगेलीचा गिरोबा जत्रोत्सव उत्साहात संपन्न
सिंधुदुर्ग/ साई सगम
गोवा व कोंकणातील होळीचा पहिला उत्सव असणारा सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील सुप्रसिद्ध गिरोबा जत्रोत्सव मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला.
सांगेलीचा गिरोबा हे ग्रामदैवत असून ते पाषाण अगर पंचधातूच्या मुर्तीचे नसून एक फणसाचे झाड आहे. दरवर्षी होळीच्या आदल्या दिवशी त्याला बदलण्याची परंपरा आहे. आदल्या दिवशी सुरू झालेला उत्सव पहाटे बदलण्यात होऊन सकाळपासून मग विधिवत पूजा सोहळा झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची रांग लागते. हा उत्सव पाहण्यासाठी गोवा, कर्नाटकातून भाविक आले होते.


