न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

घरोघरी जाऊन उत्पादन विक्री करणाऱ्या अनोळखी व्यक्तींपासून सावध राहा, सावंतवाडी पोलिसांचे आवाहन

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

सध्या सावंतवाडी शहर तसेच शहरालगतच्या गावांमध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे सांगून काही अनोळखी व्यक्ती घरोघरी फिरून विविध उत्पादनांची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर व्यक्ती नागरिकांच्या घरी जाऊन आपल्या उत्पादनांची विक्री करीत असून, त्याबाबत विचारणा केली असता नगरपरिषद सावंतवाडी यांची अधिकृत परवानगी असल्याचे सांगत असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती घेतली असता सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष श्री. अनिल निरवडेकर यांनी अशा प्रकारे घरोघरी फिरून उत्पादन विक्री करण्यासाठी नगरपरिषद सावंतवाडी यांच्याकडून कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, घरोघरी येऊन विविध उत्पादनांची विक्री करणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर तात्काळ विश्वास ठेवू नये. नगरपरिषद अथवा शासकीय विभागाची परवानगी असल्याचे सांगितल्यास संबंधित परवानगीपत्राची खातरजमा करावी. अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती, मोबाईल क्रमांक, बँक खात्याची माहिती अथवा इतर गोपनीय माहिती देऊ नये. कोणत्याही उत्पादनाची खरेदी करण्यापूर्वी संबंधित कंपनी, उत्पादनाची गुणवत्ता व विक्रेत्याची अधिकृतता तपासून घ्यावी. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्याबाबत तात्काळ सावंतवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
नागरिकांनी अशा प्रकारच्या व्यक्तींच्या आमिषाला किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीला बळी पडू नये. कोणतीही खरेदी अथवा व्यवहार करण्यापूर्वी योग्य ती खातरजमा करूनच पुढील कार्यवाही करावी.
नागरिकांनी सतर्क राहावे, सुरक्षित राहावे आणि संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना माहिती द्यावी. असे आवाहन सावंतवाडी पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे