न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

: राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने श्री. सतीश पंढरीनाथ बागल यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अपर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती देण्याचा आदेश जारी केला आहे. त्यांची सिंधुदुर्ग येथील अपर जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर बागल यांची नियुक्ती होणार आहे.

शासनाच्या २४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या आदेशानुसार, आस्थापना मंडळाच्या शिफारशीनंतर निवडश्रेणी उपजिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यानुसार सतीश पंढरीनाथ बागल यांना अपर जिल्हाधिकारी (गट-अ) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

ही पदोन्नती शासनाने नमूद केलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून देण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना पदोन्नतीच्या पदावर रुजू होण्यासाठी सध्याच्या पदावरून एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत असल्याचेही आदेशात नमूद केले आहे.

 

सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या या आदेशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला नवीन अप्पर जिल्हाधिकारी मिळणार आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे