न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पीएम स्वनिधी’ पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ पथविक्रेत्यांनी घ्यावा, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

   सावंतवाडी नगरपरिषदेच्यावतीने शहरातील सर्व पथविक्रेते आणि फेरीवाल्यांसाठी केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी ‘पीएम स्वनिधी’ पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पथविक्रेत्यांनी घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केले आहे.

या योजनेच्या मार्गदर्शनासाठी व अर्ज प्रक्रियेसाठी नगरपरिषदेमध्ये स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पहिला टप्प्यात लाभार्थ्यांना सुरुवातीला १५ हजार रुपयांचे कर्ज दिले जाते. हे कर्ज एका वर्षाच्या आत नियमित भरल्यास केंद्र सरकारकडून ७% सबसिडी दिली जाते. तर पहिले कर्ज वेळेत फेडणाऱ्या लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात २५ हजार रुपयांचे कर्ज मिळण्यास पात्र ठरवले जाते. दुसरे कर्ज दोन वर्षांच्या मुदतीत पूर्ण भरल्यास पुढील टप्प्यात ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक फेरीवाल्यांनी आणि पथविक्रेत्यांनी अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड सोबत आणावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या योजनेमुळे लहान व्यापाऱ्यांना आणि पथविक्रेत्यांना आर्थिक हातभार लागण्यास मदत होणार आहे. सावंतवाडी शहरातील सर्व पात्र पथविक्रेत्यांनी नगरपरिषदेच्या कक्षाशी संपर्क साधून या योजनेचा त्वरित लाभ घ्यावा, असे आवाहन उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांच्याकडून करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे