न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत आजगावात बैलगाडा शर्यत संपन्न

सिंधुदुर्ग / राजू तावडे

आजगाव सखेलखोल परिसरात श्री देव वेतोबा, सातेरी, भुमैया कला-क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य बैलगाडा शर्यत भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पारंपरिक क्रीडा संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या या स्पर्धेला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्याला विशाल परब यांनी प्रत्यक्ष एका बैलगाडीवर स्वार होऊन स्पर्धकांना प्रोत्साहीत केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या बैलगाडा चालकांनी वेग, कौशल्य आणि समन्वय यांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. संपूर्ण मैदानात थरारक वातावरण निर्माण झाले होते. यावेळी श्री. विशाल परब यांच्यासमवेत सावंतवाडी भाजपा युवामोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, विकास परब, गिरिष परब, अमित प्रभू, सुशील कामटेकर, कुणाल वाटजी, रामदास परब, ओंकार गोवेकर, किरण कळसुळकर, राहूल मेस्त्री आदी उपस्थित होते.
माझा राजा रे, माझा सर्जा रे असा घोष देत अनेक सर्जा राजाच्या जोड्या या शर्यतीत सहभागी झाल्या होत्या. या शर्यतीमुळे ग्रामीण भागातील पारंपरिक खेळांना चालना मिळत असून, युवकांमध्येही या क्रीडा प्रकाराबद्दल नवचैतन्य निर्माण होत आहे. आयोजकांच्या उत्तम नियोजनामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे