न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मनसे पदाधिकाऱ्यांची १८ मे ला दोडामार्ग तहसीलदार कार्यालयावर धडक

 

सिंधुदुर्ग  / राजू तावडे

दोडामार्ग तालुक्यातील विविध समस्यांवर सोमवार दिनांक १८ मे रोजी मनसेचे पदाधिकारी तहसीलदार कार्यालयावर धडक देणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व जिल्हा संपर्क अध्यक्ष शिरीष सावंत व राज्य सरचिटणीस संदीप दळवी हे यावेळी उपस्थित असणार आहेत. अशी माहिती मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी दिली.
दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथील धी ओरिजीन या कंपनी बाबत गेली अनेक वर्ष असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने तसेच दोडामार्ग तालुक्यात चालू असलेले अनधिकृत माती उत्खनन तातडीने बंद करावे. पर्यावरणाची होत असलेली हानी रोखावी. महसूल यंत्रणेला हाताशी धरून सामाईक क्षेत्र असलेल्या भागात माती उत्खनन करण्याची परवानगी मिळवायची व परवानगी पेक्षा अधिक माती उत्खनन करून परिणामी होणाऱ्या दंडाचा भरमसाठ भुर्दंड सर्वसामान्य व गरीब भागदारांच्या माथी मारायचा व आपण कोट्यवधी रुपयांची माया जमा करायची, एका सर्व्हे नंबरची परवानगी मिळवून भलत्याच भागात माती उत्खनन करायचे या व अन्य गंभीर प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी मनसे पदाधिकारी सोमवार दिनांक १८ मे रोजी सकाळी १० वाजता तहसीलदार दोडामार्ग यांची भेट घेणार आहेत. तरी मनसेच्या तसेच सर्व अंगीकृत संघटनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी दोडामार्ग तहसीलदार कार्यालयात उपस्थित रहावे असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे