न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मालवण शहरात मानवता विकास परिषदच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

सिंधुदुर्ग/

मालवण शहरात मानवता विकास परिषदच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. गुरुवार, १४ मे २०२६ रोजी लीलांजली सभागृह, मालवण येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर मानवता विकास परिषद संस्थापक अध्यक्ष, रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद संस्थापक अध्यक्ष तसेच राष्ट्रसंत श्री. पाचलेगावकर महाराज सेवा समिती कार्यवाह आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत सावंत, ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई संस्थेचे सचिव आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य व उद्योजक प्रसाद बागवे, युवा उद्योजक रोहन सावंत, सामाजिक कार्यकर्ते विजय कोळगे व मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी मानवता विकास परिषदच्या वतीने श्री. श्रीकांत सावंत यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. मान्यवर उद्योजक रोहन सावंत व प्रसाद बागवे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रमुख वक्त्या ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मराठी मालिकेच्या संवाद लेखन सहकारी वैशाली पंडित यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रातून देह, देश, धर्म आणि मानवता या घटकांचे मिळणारे संदेश यावर मार्गदर्शन केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्याला त्यांनी केलेल्या विविध खडतर साधना, अभ्यास, संस्कार आणि कौटुंबिक जाणीवांची असलेली जोड याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांनी विशेष माहिती दिली. छत्रपती संभाजी महाराज हे पराक्रमी योद्धे होते आणि सोबतच ते विद्वान, अभ्यासू आणि धर्मरक्षक राजे होते. त्यांच्या जीवनातील संघर्ष, त्याग आणि निष्ठा आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचेही वैशाली पंडित यांनी नमूद केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे