सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव ‘समाज उद्धारक पुरस्कार २०२६’ ने सन्मानित
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन फुले शाहू आंबेडकर विचार मंच वेंगुर्ला तर्फे त्यांना ‘समाज उद्धारक पुरस्कार २०२६’ ने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
गेली अनेक वर्ष रवी जाधव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाजसेवा क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रत्येक आपत्तीत मदतीचा हात देण्यासाठी रवी जाधव हे सर्वप्रथम हजर असतात. कॉलेज जीवनापासून ते समाजातील उपेक्षित समाजासाठी काम करत आहेत. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मंत्रानुसार स्वतः उच्च शिक्षण घेऊन समाज संघटित करण्यासाठी त्यानीं दिलेले योगदान फार मोठे आहे. समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी, अंधश्रद्धा या विरोधात त्यांचा लढा निरंतर सुरूच आहे. सावंतवाडीतील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेचा ते एक महत्त्वाचा भाग असून गेली अनेक वर्ष गरजवंत आणि निराधारांना आधार देण्यासाठी कार्यरत आहेत. रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन रुग्णसेवा आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांचे कार्य आदर्शवत आहे. गोरगरीब कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्या पासून ते न्याय हक्कासाठी प्रसंगी आंदोलनासारखा पावित्रा घेऊ नेहमीच न्याय मार्गाने पाठराखण केली आहे. यासाठी रवी जाधव यांना ‘समाज उद्धारक पुरस्कार २०२६’ ने गौरविण्यात आले आहे.
याप्रसंगी रथ समतेचा समूह गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ , सभापती शंकर घार, सरपंच निलेश चमणकर, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, फुले शाहू आंबेडकर विचार मंच अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, सचिव महेंद्र मातोंडकर तसेच ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव, सिंधुदुर्ग कार्याध्यक्ष अनिल जाधव, चंद्रकांत म्हापणकर,आदिती पै, सुहास कोळसुलकर, मिलिंद परब, सत्यवान तेंडुलकर, सुनील जाधव, चैत्राली जाधव उपस्थित होते.


