न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

वाफोली ग्रामस्थांतर्फे संजय आईर यांचा सत्कार

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय आईर यांचा नुकताच वाफोली पिंपळेश्वर युवक मंडळ मधलीवाडी व वाफोली ग्रामस्थांनी सत्कार केला. संजय आईर यांनी सामाजिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य व वाफोली ग्रामीण मार्ग 93 चे कॉंक्रिटीकरण करून रस्त्याचे काम मार्गी लावल्याबद्दल पिंपळेश्वर युवक मंडळ यांनी आयोजित केलेल्या बाळूमामा या नाट्यप्रयोगाच्या मंचावर श्री. आईर यांना शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना श्री आईर म्हणाले, वाफोली ग्रामस्थांचा मी आभारी व ऋणी आहे. माझ्या वाफोली गावात माझा झालेला सत्कार हा इतर सत्कारापेक्षा माझ्यासाठी अवस्मरणीय क्षण असून, मला स्फूर्ती व बळ देणारा आहे. वाफोली ग्रामीण मार्ग 92 या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करताना वाफोली गावातील लोकांनी सहकार्य करून खारीचा वाटा उचलला त्यांना हा सत्कार अर्पण करीत आहे. असे श्री आईर म्हणाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे