सांगलीतील कृष्णा नदीत पुन्हा हजारो मासे मृत्युमुखी
सांगली/
सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. कृष्णा नदीतल्या सांगली बंधाऱ्याजवळ शेकडो मासे मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे नदी काठावर मोठी दुर्गंधी पसरली आहे. कृष्णा नदीची पाण्याची पातळी सध्या खालावली आहे. अशामध्ये शहरातल्या शेरीनाल्याचे सांडपाणी आणि नदी काठच्या कारखान्यांकडून सोडण्यात येणाऱ्या मळी मिश्रित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.


