न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

महाराष्ट्रातील सात इंजिनिअरींग शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा चेन्नईमध्ये मृत्यू

नागपूर/

महाराष्ट्रातील ७ भावी इंजिनिअर्सचा चेन्नईतील समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. जळगावचा तरुण जय अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे. चेन्नईतील गोल्डन बीचवर शनिवारी ही दुर्घटना घडली. हे सर्व तरुण-तरुणी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. चेन्नईतील कॉग्निझंट या आयटी कंपनीमध्ये ते इंटर्नशिप करण्यासाठी गेले होते. शनिवारी सुट्टी असल्यामुळे हे सर्व मुलं आणि मुली पाँडिचेरी रोडवरील कांथाट्टूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेले होते.

ही सर्व मुलं आणि मुली गोल्डन बीचवर मजामस्ती करत होते. सर्वजण एकत्र येत सेल्फी काढत होते. त्याचवेळी एक मोठी लाट आली आणि ती या सर्व मुलांना सोबत घेऊन गेली. सर्वच्या सर्व १५ मुलं समुद्रात बुडाली. यामधील ७ जणांचा मृतदेह आतापर्यंत सापडला आहे. यामध्ये तीन मुली आणि चार मुलांचा समावेश आहे. भंडारा, नागपूर, नांदेड, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील ही सर्व मुलं आहेत. तर जळगावच्या जय पाटीलसह आणखी काही जण अद्याप बेपत्ता आहेत त्यांचा शोध घेतला जात आहे”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे