न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

महास्वच्छता अभियानाच्या माध्यमातून सावंतवाडी शहरातील सर्व परिसरात स्वच्छ

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

राष्ट्रीय संत गाडगेबाबा महाराज यांनी आपल्या आयुष्यात स्वच्छतेला फार महत्व दिले. सर्वांना स्वच्छतेचे धडे त्यांनी दिले. स्वच्छतेमुळे आरोग्य सुदृढ राहते आणि समाज निरोगी बनतो, असा संदेश गाडगेबाबा यांनी आपणाला दिला आहे. म्हणूनच त्यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे शहरात आम्ही दिनांक २० ते २३ फेब्रुवारी असे तीन दिवस महास्वच्छता अभियान राबविले आहे. या अभियानाच्या माध्यमातून शहरातील दहावी प्रभागामधील परिसरात स्वच्छता केली जाईल. असे प्रतिपादन सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केले.
संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात आयोजित महास्वच्छता अभियानाचा समारोप प्रसंगी ॲड. अनिल निरवडेकर आज सकाळीच जगन्नाथराव भोसले उद्यान येथे आयोजित स्वच्छता मोहीम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगरपरिषदेचे आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर, नियोजन व वित्त सभापती आनंद नेवगी, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, नगरसेविका सुनीता पेडणेकर, नीलम नाईक, स्नेहा नाईक, ॲड. सायली दुभाषी, माजी नगरसेवक विलास जाधव, नगरसेवक देवेंद्र टेमकर, स्वच्छता विभागाचे अधिकारी वैभव अंधारे, विनोद सावंत, देविदास आडाळकर उपस्थित होते.
या प्रसंगी ॲड. अनिल निरवडेकर यांनी नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत, “कचरा करू नका, घराभोवती स्वच्छता ठेवा; शहर आपोआप स्वच्छ राहील,” असे आवाहन केले. स्वच्छता कर्मचारी ही माणूसच असून आपण केलेली घाण साफ करताना त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. गटारात उतरून किंवा कचऱ्यात काम करताना होणारी यातना लक्षात घेऊन प्रत्येकाने जबाबदारीने वागावे. नागरिकांनी स्वच्छता राखली तर सफाई कर्मचाऱ्यांचे कामही सुलभ होईल आणि शहर स्वच्छ-सुंदर बनेल. असे निरवडेकर म्हणाले.
दरम्यान शहरातील विविध भागांत स्वतंत्र पथकांद्वारे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि तरुणांच्या सहभागामुळे अभियान यशस्वी झाल्याचे आयोजकांनी सांगितले. यामध्ये विशेष करून महिला बचत गट, महिला मंडळ व शालेय विद्यार्थ्यांनी मोठे योगदान दिले. दरम्यान सावंतवाडी पोलीस स्टेशन परिसरात मराठा अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी राबविलेल्या स्वच्छता अभियानाला प्रभारी नगराध्यक्ष श्री. निरवडेकर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी “स्वच्छ, सुंदर, निरोगी आणि कचरामुक्त शहर” करण्याची सामूहिक शपथ घेतली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे