न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

जातनिहाय जनगणनेसाठी दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावधान …. मराठा महासंघाचे अध्यक्ष ॲड. सुहास सावंत

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

केंद्र सरकार मार्च महिन्यात जातनिहाय जनगणना सुरु करणार आहे, म्हटल्यावर कोणत्या ही कायदेशीर गोष्टीची माहिती न घेता मराठा समाजाने आपली जात कुणबी सांगावी अशी धोकादायक व दिशाभूल करणारी माहिती काही माध्यमातून काही लोक जाहीर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत सावधानता बाळगावी असे आवाहन मराठा महासंघाचे अध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांनी केले आहे.
आरक्षण आणि जातनिहाय यांचा कसला ही संबंध नाही. जातनिहाय जनगणना केल्यावर फक्त प्रत्येक जातीची लोकसंख्या समजणार असून त्यानुसार मागास आयोगाला त्या जाती आरक्षणाला पात्र आहेत का नाही यासाठी त्यांचे प्रतिनिधित्व तपासात येणार आहे व ते एकदम सटीक पद्धतीने शोधता येणार आहे. असे श्री. सुहास सावंत यांनी म्हटले आहे.
जातनिहाय जनगणना करताना कुणबी आहोत असे सांगितल्याने मराठा जात कागदोपत्री नोंद असलेल्यांना कुणबी दाखला मिळणार नाही.आरक्षण देण्यासाठी 1967 पूर्वी कुणबी नोंद असणे आवश्यक आहे. याशिवाय कुणबी नोंद असलेल्या व्यक्ती सोबत थेट वंशावळ जुळणे आवश्यक आहे.
आता जातनिहाय जनगणना करताना कुणबी आहोत असे सांगून कोणाला ही कुणबी दाखला मिळणार नाही. मराठा समाजाने कुणबी नसताना स्व:ताची जात कुणबी सांगणे म्हणजे ओबीसी समुहाची लोकसंख्या वाढवणे आहे, यामुळे मराठा आरक्षणाचे सगळे कायदेशीर व घटनात्मक मार्ग बंद होणार आहेत हे लक्षात घ्यावे. या शिवाय खोटी माहिती दिल्याबद्दल सेंसस विभाग कायदेशीर कारवाई करू शकते, असे ॲड. सावंत यांचे म्हणणे आहे.
बांधवानो,सत्याचा आधार घेऊन आपण ही लढाई कायदा आणि संविधानाच्या माध्यमातूनच जिंकू शकतो. सत्यसोबत उभे रहा, भावनीक होऊन स्वतःचे आणि समाजाचे नुकसान करू नका असे आवाहन ॲड. सुहास सावंत यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे