भटक्या कुत्र्याने घेतला चार वर्षीय मुलाच्या मानेला चावा …. समीरा खलील मुळे अनर्थ टळला
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सावंतवाडी बाहेरचावाडा येथे घराच्या बाहेर खेळत असलेल्या चार वर्षीय मुलावर भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने झडप घालून त्याच्या मानेचा चावा घेतल्याची घटना आज घडली. कुत्र्याने हल्ला केल्यामुळे मुलगा जोरदार किंचाळू लागला हे पाहून समीरा खलील हिने आपल्या जीवाची परवा न करता त्या कुत्र्याच्या तोंडातून त्या मुलाला काढून घेतले आणि मुलाचा जीव वाचवला. त्यावेळी त्या मुलाच्या मानेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. समीरा खलील हिने तात्काळ मुलाला उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले.
सदर मुलावर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्याच दरम्यान असं समजले की सकाळपासून सहा जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला असून ते उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी आले होते.
ही बाब अतिशय गंभीर असून शासनाने यासंदर्भात लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व समीरा खालील यांनी केली आहे.


