न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

हिंदू म्हणून आपण श्वास घेतोय याचे श्रेय छत्रपती शिवरायांना …..पालकमंत्री नितेश राणे

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

इस्लामिक आक्रमक होताना, आपल्या माता भगिनींची अब्रू लुटली जाताना छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली. रयतेचे राज्य म्हणून त्याला ओळख निर्माण करून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी दिलेले योगदान मोठ आहे. हिंदू म्हणून आपण श्वास घेतोय याचे सगळे श्रेय छत्रपती शिवरायांना जाते, असे मत पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथे आज गुरुवारी सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित महाराष्ट्राचा ‘शाहिरी बाणा’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, युद्धनीती, प्रशासनाचा कारभार, रयतेला न्याय देण्याच्या बाबतीत महाराजांनी आमच्या समोर आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्राला शिवरायांमुळे वेगळी ओळख मिळाली. छत्रपतींच्या कार्यातून आपण प्रेरणा घेऊन कार्यरत असल पाहिजे. महाराष्ट्र राज्य हे छत्रपतींच्या विचारांवर चालणारे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा विचार जपला जात आहे. आपणही स्वराज्याचे मावळे म्हणून छत्रपतींचा हा विचार जपला पाहिजे अस आवाहन श्री. राणे यांनी केले. जिल्हा प्रशासनाने शाहीरी बाणाच्या माध्यमातून आयोजित केलेला कार्यक्रम कौतुक त्यांनी केले. सांस्कृतिक क्षेत्रात असणार प्रशासनाचे काम उल्लेखनीय असल्याचे उद्गार पालकमंत्री नितेश राणेंनी काढले.
यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आजही महाराष्ट्रात चालत आहे. शेतकऱ्यांबाबत धोरण, पर्यावरण, महिलांचा आदर करणारे जाणते राजे शिवाजी महाराज होते. स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणास्थान शिवराय राहीले आहेत असे श्री. केसरकर म्हणाले.
यानंतर लेखक, दिग्दर्शक राष्ट्रभुषण शाहिर रूपचंद चव्हाण यांचा महाराष्ट्राचा ‘शाहिरी बाणा’ कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, लखमराजे भोंसले, अप्पर जिल्हाधिकार शुभांगी साठे, भुसंपादन अधिकारी आरती देसाई, बालाजी शेवाळे, प्रांताधिकारी समीर घारे, तहसीलदार श्रीधर पाटील, दिग्दर्शक दीपक कदम आदींसह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रांताधिकारी समीर घारे यांनी केले. आभार तहसीलदार श्रीधर पाटील यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे