न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

म्हापसा येथील सोसायटीत आढळला अनोळखी मृतदेह

म्हापसा /

म्हापसा शहरात आज गुरुवारी  सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. म्हापसा येथील ‘ब्रागांझा अपार्टमेंट’ (B परिसराच्या जवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले असून स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले.

घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सर्वप्रथम परिसराची नाकेबंदी करुन पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. घटनास्थळी ‘108’ रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले, मात्र वैद्यकीय पथकाने त्या व्यक्तीला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक साक्षीदारांच्या उपस्थितीत रीतसर पंचनामा प्रक्रिया पूर्ण केली. मृतदेहाजवळ कोणतीही ओळख पटवणारी कागदपत्रे किंवा वस्तू सापडल्या आहेत का, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे