न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

राज ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करा…संपर्क अध्यक्ष शिरीष सावंत

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस रविवार दिनांक १४ जून रोजी होणारा आहे. राज ठाकरे यांचा हा
वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात यावा, असे आवाहन मनसे नेते व सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष शिरीष सावंत यांनी सावंतवाडी येथे आयोजीत करण्यात आलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये केले.
मनसेच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सावंतवाडी येथे आज आयोजीत करण्यात आली होती. यावेळी बोलताना सावंत यांनी पक्ष वाढीबाबत मार्गदर्शन केले. मनसेला मानणारा वर्ग आजही मनसे सोबत असून आज पैशाचे राजकारण सर्वत्र जोर धरत असताना देखील सर्व पदाधिकारी आपल्या पद्धतीने पक्षाचे काम करत आहेत. सत्ताधारी पक्षाकडून भ्रमनिरास झालेली सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाली आहे. महागाईच्या वरवंट्याखाली जनता भरडली जात असल्याचे यावेळी शिरीष सावंत म्हणाले.
या बैठकीला जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, धीरज परब, सुधीर राऊळ, कुणाल किनळेकर, गणेश वाईरकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत,राजू कासकर, सुनिल आसवेकर, काशीराम गावडे, चिन्मय नाडकर्णी, विष्णू वसकर, केतन सावंत, राज सावंत, संतोष शेळके, समीर म्हापणकर, सुरज राऊळ, गुरुदास गवंडे, श्रीराम सावंत इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे