न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बांदा येथे रविवारी जागतिक रक्तदाता दिनी भव्य रक्तदान शिबिर

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

रविवार दिनांक १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधत आणि जिल्ह्यात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा काही प्रमाणात भरून काढण्याच्या उद्देशाने कट्टा कॉर्नर बांदा येथील आनंदी मंगल कार्यालय या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील रक्ताची गरज लक्षात घेता रक्तदात्यांनी रक्तदानासारखे महापुण्यदान करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबीर श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा, सार्वजनिक नवरात्रौत्सव व कला क्रीडा मंडळ, कट्टा कॉर्नर बांदा, ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदा आणि रक्तदान चळवळीत सातत्यपूर्ण काम करणारी ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा बांदा यांच्या सहकार्याने आयोजित केले आहे. रविवारी दि. १४ जून २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १.०० या वेळेत सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
इच्छुक रक्तदात्यांनी ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री दयानंद गवस (9821444170), स्वराज्य प्रतिष्ठानचे निलेश मोरजकर (9763717790), अक्षय मयेकर (9503871924), सार्वजनिक नवरात्रौत्सव व कला क्रीडा मंडळाचे नाना शिरोडकर (9767577774), ज्येष्ठ नागरिक विकास मंचचे सचिव गुरुनाथ नार्वेकर (9422379346) आणि समीर परब (9823830119) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे