देवेंद्रा हे काय चाललंय?… सांगलीत बालिकेची हत्या
सांगली/
सांगलीच्या भरवस्तीत एका माथाडी नेत्याच्या घरात चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी घुसून त्याच्या अवघ्या १४ वर्षांच्या नातवाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला असून पोलिसांनी या प्रकरणात हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली आहे. या मुलाची अशा प्रकारे हत्या झाल्याने संपू्र्ण सांगली शहर सुन्न झाले आहे.
सांगलीमध्ये भरवस्तीमध्ये एका स्थानिक नेत्याच्या घरात घुसून चार ते पाच हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली आहे. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या हल्ल्यात घरातील एका १४ वर्षांचा चिमुरडा जखमी होऊन त्याचे प्राण गेले आहेत. त्यामुळे सांगलीत घबराट पसरली आहे. सांगलीच्या भरवस्तीत या अचानक झालेल्या घटनेने सांगली हादरली आहे.


