न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भर पावसात आज तुकोबाराय निघणार पंढरीस….

पुणे/ वृत्तसंस्था

आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज, मंगळवारी (सात जुलै) देहू येथून प्रस्थान होणार आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. मुसळधार पावसामुळे प्रस्थान सोहळ्याच्या तयारीला मर्यादा आहेत. मात्र, ग्रामस्थ आणि वारकऱ्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. ते तुकोबासंगे सावळ्या विठूरायाला भेटण्यासाठी आतुर आहेत. देहू येथील मुख्य मंदिरात सोहळ्याची जय्यत तयारी चालू आहे.

सोहळ्यासाठी यंदा नवीन रथ तयार करण्यात आला आहे. भरपावसात रथाची मिरवणूक काढण्यात आली. याशिवाय मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. इंद्रायणीला पूर आल्याने नदीकिनारी बॅरिकेडींग केले असून, वारकऱ्यांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे

आळंदीतून माऊली उद्या बुधवारी प्रस्थान करणार आहेत. त्या अनुषंगाने नवीन रथ अर्पण सोहळा सोमवारी आयोजित केला होता; परंतु मुसळधार पावसामुळे कार्यक्रम स्थगित करण्यात आला. पावसामुळे प्रस्थान सोहळाही मर्यादित स्वरूपात होणार असून, वारकरी, मानकरी, ग्रामस्थ, पोलिस आदी १६६० जणांना फक्त मंदिर प्रवेश मिळेल

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे