न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीतील ऐतिहासिक ‘मिलाग्रिस कॅथेड्रल’ चे उद्घाटन ….. शहरात भव्य मिरवणूक 

 

सिंधुदुर्ग राजू तावडे 

    सावंतवाडीतील ऐतिहासिक आणि पुनर्रचित ‘मिलाग्रिस कॅथेड्रल’च्या भव्य सोहळ्याचे उद्घाटन मुंबईचे आर्चबिशप एमिरेट्स कार्डिनल ऑस्वल्ड ग्रेशियस यांच्या हस्ते संपन्न झाले. तर मुख्य मिसा अर्पण सोहळ्याचे अध्यक्षपद गोवा आणि दमणचे आर्चबिशप कार्डिनल फिलिप नेरी फेराव यांनी भूषाविले.

सिंधुदुर्ग धर्मप्रांत २००५ साली उदयास आला. या धर्म प्रांतातील सावंतवाडी मिलाग्रीस महामंदिराचे नूतनिकरण गेल्या पाच वर्षांपासून सुरु करून आजच्या घडीला पूर्णत्वास आले आहे. या स्थापना झालेल्या ऐतिहासिक आणि पुनर्रचित ‘मिलाग्रिस कॅथेड्रल’चा भव्य उद्घाटन व आशीर्वाद सोहळा आज शनिवारी संपन्न झाला. या सोहळ्यासाठी ख्रिस्तधर्मीय जगतातील अनेक उच्चपदस्थ कर्डीनल्स, बिशप, धर्मगुरु आणि मान्यवर उपस्थित होते. हा ऐतिहासिक क्षणी सुमारे ५ हजार भाविक उपस्थितीत होते.

याप्रसंगी मुंबईचे आर्चबिशप जॉन रॉड्रिग्ज, पुण्याचे बिशप सायमन अल्मेडा, अमरावतीचे बिशप मॅल्कम सिक्वेरा, बेळगावचे बिशप डेरिक, गोव्याचे बिशप सिमाव, नाशिकचे बिशप लुर्ड्स आणि सिंधुदुर्गचे पहिले बिशप एमिरेट्स ऑल्विन बर्रेटो यांच्यासह सलेशियन, जेझुइट, कॅप्यूचिन आणि फ्रान्सालियन या धार्मिक संस्थांचे प्रांतीय प्रमुख उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सकाळी ९ वाजता नूतनीकरण केलेल्या कॅथेड्रलचा मुख्य उद्घाटन व आशीर्वाद सोहळा संपन्न झाला.

दुपारी १२ वाजल्यापासून सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये धार्मिक मान्यवर, माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर, सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राजेसाहेब खेमसावंत भोंसले, शुभदादेवी भोंसले, लखमराजे भोंसले, माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, न. प. सभापती सुधीर आडिवरेकर, प्रतीक बांदेकर, सौ. मोहिनी मडगांवकर, दीपाली भालेकर, नगरसेवक अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, देवा टेमकर, नगरसेविका सुकन्या टोपले, शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, सुनिता पेडणेकर, स्नेहा नाईक, दुलारी रांगणेकर, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, तानाजी वाडकर, कॅथेड्रलचे आर्किटेक्ट ब्रायन सोरेस, इंजिनिअर व कॉन्ट्रॅक्टर मिलिंद तसेच आजी-माजी नगरसेवक लोकप्रतिनिधी व पत्रकार बांधवांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्याकडून ख्रिस्ती धर्मगुरूंना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सिंधुदुर्ग प्रांताचे बिशप ॲग्नेलो पिन्हेरो यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करत मिलाग्रीस कॅथेड्रलच्या पूर्णत्वासाठी योगदान देणाऱ्यांचे ऋण व्यक्त केले.

यावेळी फादर मिलेट डिसोजा, विकर जनरल रेव्ह. फादर अँद्रू डिमेलो, सहाय्यक धर्मगुरू फादर अमृत, सल्लागार रेव्ह. फादर फेलिक्स लोबो, प्राचार्य रेव्ह. फादर रिचर्ड, माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो, सावंतवाडी कॅथॉलिक असोसिएशनचे अध्यक्ष जॉय डान्टस, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, जॉनी फेराव,ऑगस्तीन फर्नांडिस, जो रॉड्रिक्स, डुमिंग डिसोजा, ग्रेगरी डान्टस, जॉन फर्नांडीस, स्टिवन डिसिल्वा, रेमी आल्मेडा, डुमिंग आल्मेडा, लॉरेन्स डिसोजा, रॉबर्ट आल्मेडा, डुमिंग डिसोजा, नेल्सन मिनेजिस, अलेक्स डिसिल्व्हा आदींसह कॅथॉलिक संस्थांचे पदाधिकारी व ख्रिस्ती बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे