न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सिंधुदुर्ग : आशिष सुभेदारांच्या इशाऱ्यानंतर खासकीलवाड्यातील विकासकामे सुरू

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

खासकीलवाडा व न्यू खासकीलवाडा प्रभागातील रखडलेल्या विकासकांमाबाबत शिवसेना उबाठा कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी इशारा दिल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने या प्रभागातील विकासकामाना सुरुवात केली आहे.
खासकीलवाडा व न्यू खासकीलवाडा प्रभागात सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक यांच्या गटबाजीमुळे अनेक कामे ठप्प झाली होती. ठेकेदार व प्रशासन यांच्यात टाळमेळ नसल्याने निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने ऐन उन्हाळी हंगामात नागरिकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ठिकठिकाणी पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप श्री. सुभेदार यांनी केला होता.अनेक विकासकामांचे टेंडर, वर्क ऑर्डर झाली मात्र कामे सुरू करू नये असे आदेश पालिकेतून आल्याने ही कामे रखडली होती. आता पावसाळा जवळ आला विकासकामे तसेच पाइप लाइनची कामे पूर्ण होणार कधी असा सवाल सुभेदार यांनी केला. कचऱ्याची दुर्गंधी, लाइन वरील झाडी तोडणे, स्ट्रीट लाईन ची कामे, अर्धवट गटार बांधकाम हे प्रमुख कामे रखडली आहेत तर खोदाई देखील चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. नगरसेवकांच्या गटबाजीचा परिणाम स्थानिक विकासकामांवर होत आहे. असे श्री. सुभेदार म्हणाले.
काही कामे पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात पाणी तुंबून लोकांच्या घरात पाणी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही कामे न झाल्यास स्थानिक नागरिकांना घेऊन मुख्याधिकारी याना घेराव घालण्याचा इशारा आशिष सुभेदार यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर पालिकेकडून विकासकांमाना सुरुवात करण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे