विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण… २३ जुलैला मुंबई बंदची प्रकाश आंबेडकरांची हाक
मुंबई/ वृत्तसंस्था
सदाभाऊ खोत यांनी दिल्लीत झालेले नीट पेपर फुटी प्रकरणातील आंदोलक हे आंतकवादी असल्याची टीका केली आहे, याबाबत प्रतिक्रिया विचारली असताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की हे सरकारच आंतकवादी आहे. मुंबईतील आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत ते बेकायदेशीर आहे. हे कोर्टात टिकणार नाही असाही दावा त्यांनी यावेळी केला.
मुंबईत २३ जुलै रोजी होणारा ‘मुंबई बंद’ हा अत्यंत शांततेत असणार आहे. या बंदमध्ये बेस्ट, कर्मचारी, टॅक्सीवाले, व्यापाऱ्यांनी एक दिवस व्यवसाय बंद करुन पाठींबा द्यावा असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे


