नांदेडात अवैध वाळू उपसा करणारे दोन तराफे पोलीसांनी जाळले
नांदेड/
नांदेडमधील गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणारे साहित्य पोलिसांनी जाळून नष्ट केले. नांदेड ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. विष्णूपुरी प्रकल्पाजवळ नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. ग्रामीण ठाण्यातील पोलीस पथक त्या ठिकाणी पोहचले. पोलीसांना पाहून वाळू उपसा करणारे दोघे फरार झाले.पोलिसांनी वाळू उपसा करणारी बोट आणि काही तराफे जाळून नष्ट केले.दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


