न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पुणे सातारा महामार्गावर टॅंकर पलटी… वाहतुक मंदावली

सातारा/

खंबाटकी घाट परिसरात आज सकाळी भीषण अपघात घडला. पुणे–सातारा महामार्गावर टँकर पलटी झाल्याने वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झाला असून, वाहनांच्या लांबलचक रांगांनी संपूर्ण परिसर ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

घाटाच्या पायथ्याशी झालेल्या या अपघातानंतर खंडाळा ते केसर्डी दरम्यान वाहनांच्या अखंड रांगा लागल्या. सकाळी साडेसात वाजल्यापासून वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे. रविवारची सुट्टी असल्याने महामार्गावर वाहनांची नेहमीपेक्षा अधिक गर्दी होती. त्यातच अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सातच्या सुमारास टँकर नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. अपघातानंतर वाहतूक विस्कळीत झाली आणि सुमारे तीन ते साडेतीन तास महामार्गावर वाहतुकीचा मोठा खोळंबा निर्माण झाला. जरी घाटाच्या वरच्या भागात वाहतूक सुरू असली तरी खालच्या बाजूस परिस्थिती तणावपूर्ण होती.

टँकर पलटी झाल्यामुळे काही काळ एकाच बाजूने वाहतूक वळवण्यात आली. परिणामी, वाहनांची गती अत्यंत मंदावली. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर टँकर रस्त्याच्या कडेला करण्यात आला; मात्र त्यानंतरही वाहतुकीचा ताण पूर्णपणे कमी झालेला नाही.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे