न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

देवगडच्या विकासावर कुणालाही गालबोट लावू देणार नाही; अणुऊर्जा प्रकल्पाचा विषय संपला; पालकमंत्री नितेश राणे 

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

   देवगडच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटन, रोजगार, पायाभूत सुविधा आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, देवगडच्या विकासावर कोणालाही गालबोट लावू देणार नाही, असा ठाम विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. देवगड येथे नाट्यगृह व पर्यटन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आज ते बोलत होते.

‌यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, देवगड तहसीलदार शितल जाधव, नगराध्यक्ष साक्षी प्रभू, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, महिला बालकल्याण सभापती सौ. अनुराधा नारकर, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, बाळ खडपे, संजय बोबडे, मंडल तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, बंड्या नारकर सचिव योगेश चांदोसकर वैभव कळंगुटकर उपस्थित होते .

राणे म्हणाले, गेल्या बारा वर्षांत देवगडकरांनी जी मागणी केली, ती पूर्ण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. पर्यटनाला चालना देण्यासाठी पवनचक्की परिसरातील गार्डन, कंटेनर थिएटर, वॅक्स म्युझियम, क्रीडा संकुल, अभ्यासिका आणि आता नाट्यगृह उभारण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. अशा प्रकल्पांमुळे महाराष्ट्रभरातून पर्यटक देवगडमध्ये येत असून स्थानिक बाजारपेठेला चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

राणे यांनी अणुऊर्जा प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही भाष्य करत, देवगडसाठी असा कोणताही प्रस्ताव निश्चित झालेला नसून हा विषय संपलेला आहे, असे स्पष्ट केले. अफवा पसरवून गुंतवणुकीसाठी प्रतिकूल वातावरण निर्माण करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

देवगडचा विकास वेगाने करण्यासाठी देवगड–ओरस दरम्यान केवळ ४० मिनिटांत प्रवास होईल असा नवीन रस्ता उभारण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर पुढे नेला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आनंदवाडी बंदर प्रकल्पासाठी ११० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून कामाला गती दिल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बि.डी. बागुल यांनी केले नाट्यगृह उभारणी करून स्वप्न पूर्ण केले म्हणून यावेळी देवगड पर्यटन समितीतर्फे प्रमोद नलावडे तसेच युथ फोरम तर्फे सिद्धेश माणगावकर व इतर यांनी सत्कार केला .सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे