न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

रत्नागिरीत अल्पवयीन विद्यार्थिनीशी लैंगिक संबंध… शिक्षकावर गुन्हा

रत्नागिरी / मेघेश मोंडकर

रत्नागिरी जिल्ह्यातील एका शिक्षकाने फेब्रुवारी २०२१ ते जानेवारी २०२६ या कालावधीत अल्पवयीन विद्यार्थीनीशी अनैतिक संबंध प्रस्थापित करुन व लग्नाचे दाखविलेले आमिष नाकारल्याने सदर पिडीत मुलीने रत्नागिरी पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सदर पिडीत मुलीच्या अर्जाची तत्काल दखल घेवून पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

या संदर्भात अधिक वृत्त असे की, रत्नागिरी जिल्ह्यातील एका ज्युनिअर कॉलेमध्ये प्राध्यापक असलेल्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीशी प्रेमसंबंध निर्माण केले. लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवले. शहराबाहेर देखील पिडीत विद्यार्थीनीला फिरवून आणले. त्यानंतर आता सदर शिक्षकाने पिडीत मुलीला उपभोग घेवून नाकारल्याने तिने रत्नागिरी जिल्हा पोलिसांत धाव घेतली. सदर शिक्षकाविरुद्ध ६४/१,२फ, ६४/२एफ, ६९/३५१ भारतीय दंड विधान प्रमाणे कारवाई तसेच पोक्सो ४६८१० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियंका देसाई या गुन्ह्यासंदर्भात अधिक तपास करीत आहेत.

4/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे