न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

शेकडो महिलांचे शोषण करण्याचा आरोप असलेल्या अशोक खरात विरोधात भाजपा महिला आघाडीने ‘ब्र’ का काढला नाही… उबाठा

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने केलेल्या कथित पण गंभीर आरोपांवर सध्या वातावरण तापले असताना आता भाजपा महिला आघाडीने त्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. आपण गिरीजा च्या पाठिशी खंभीरपणे उभे असल्याचे सांगण्यात आल्या नंतर शिवसेना उबाठाकडूनही प्रश्न विचारला जात आहे.

विनायक राऊत यांच्यावर आरोप झाले आहेत एका महिलेचे… पण  रूपाली चाकणकरांसह सत्ताधाऱ्यांतील अनेकांच्या संपर्कात असलेल्या बुवा अशोक खरातवर तर शेकडो महिलांनी  शोषण केल्याचा महा गंभीर आरोप केले होते. तेव्हा हि भाजपा महिला आघाडी कुठे होती असा सवाल उबाठा गटाकडून करण्यात आला आहे.

गिरीजा राऊत हिने केलेले आरोप गंभीर असून त्याला उबाठा समर्थन अथवा विरोध करीत नाही. सत्य काय ते समोर येईलच  … पण अशोक खरात बाबतीत पुरावे समोर आले तरीही कुणीही आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसले नाही असा आरोप उबाठा गटाकडून करण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे