अलिबागमध्ये संतापजनक प्रकार; अज्ञाताचा मृतदेह तीन तास रस्त्यावरच ठेवला
रायगड/ वृत्तसंस्था
अलिबाग शहरातील एसटी स्थानकासमोर रविवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने जिल्ह्यातील आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्थानकासमोर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मात्र, पंचनामा पूर्ण झाल्यानंतरही तो जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यासाठी तब्बल तीन तास शववाहिका अथवा ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल नाईक यांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत असून, नागरिकांनी प्रशासनाच्या नियोजनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.


