न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रमात योगेश सपकाळ प्रथम

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

     ‌यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर अभ्यासकेंद्रावरील वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रमाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. अभ्यासक्रमात योगेश सपकाळ यांनी ७४.५० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. चेतन बोडेकर यांनी ७३ टक्के गुणांसह द्वितीय, तर प्रफुल्ल जाधव यांनी ७२.२५ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

यंदाचे हे अभ्यासक्रमाचे २२ वे वर्ष असून विद्यार्थ्यांना केंद्र संयोजक राजेश मोंडकर, माजी केंद्र संयोजक संदीप तेंडोलकर तसेच मंगल नाईक-जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल अभ्यासकेंद्र प्रमुख रमेश बोंद्रे, श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, डॉ. जी. ए. बुवा आणि ग्रंथपाल महेंद्र पटेल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी श्रीराम वाचन मंदिर अभ्यासकेंद्र किंवा केंद्र संयोजक राजेश मोंडकर आणि मंगल नाईक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे