स्मार्ट मिटर तीव्र विरोध…. चिपळूणचा दौरा उदय सामंत नी रद्द केला… नागरिक संतप्त
रत्नागिरी/ प्रतिनिधी
धसका…. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचा नियोजित चिपळूण दौरा अचानक रद्द झाल्याने शहरातील नागरिक, महिला आणि विविध संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार होते. मात्र, ऐनवेळी दौरा रद्द झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पालकमंत्र्यांचा दौरा रद्द झाला असला तरी स्मार्ट मीटरविरोधातील आमचा विरोध कायम राहणार आहे. भविष्यात कोणतेही मंत्री चिपळूण दौऱ्यावर आल्यास आम्ही त्यांची भेट घेऊन हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडणार आहोत, असे काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक साजिद सरगुरोह यांनी आरोप करत सांगितले.


