न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

झाराप येथे २९ मार्चला मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिर

सिंधुदुर्ग / राजू तावडे

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा यांच्या सहकार्याने मल्लसम्राट प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग व श्री देवी भावई सेवाभावी सामाजिक संस्था, झाराप यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत केंद्र शाळा झाराप नं. १, श्री देवी भावई मंदिराजवळ, ता. कुडाळ येथे होणार आहे.
या शिबिरामध्ये विविध व्याधींवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार करण्यात येतील. या शिबिरात प्रामुख्याने हृदयरोग, उच्च रक्तदाब, ॲलर्जी, त्वचारोग, पचनसंस्थेच्या समस्या, हाडे व सांध्यांचे आजार, पक्षाघात व वातविकार, मूळव्याध, भगंदर, बालरोग, स्त्रीरोग तसेच इतर जुनाट विकार यांचा समावेश आहे.
तसेच रुग्णांना प्रकृतीनुसार योग्य आहार-विहार, योग व आरोग्यविषयक मार्गदर्शन केले जाणार असून नागरिकांनी या सेवाभावी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक ९४२०९०६६९२ वर संपर्क साधावा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे