न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

जिल्हास्तरीय ‘सिंधू सरस २०२६’ मध्ये इन्सुलीच्या ‘तिरंगा प्रभाग संघा’चे यश

​सिंधुदुर्ग| राजू तावडे

​सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय ‘सिंधू सरस २०२६’ प्रदर्शनामध्ये सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील ‘तिरंगा प्रभाग संघा’च्या महिलांनी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे.
​’सिंधू सरस’च्या माध्यमातून महिलांमधील सुप्त गुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इन्सुलीच्या तिरंगा प्रभाग संघाच्या प्रतिनिधींनी ‘खेळ पैठणीचा’ या लोकप्रिय स्पर्धेत ग्रामसखी दिव्या देसाई (डेगवे) यांनी प्रथम क्रमांकाचे मानाचे बक्षीस पटकावले. तसेच, पाककला स्पर्धेत रोणापाल येथील एलआरपी (LRP) नमिता शेगडे यांनी प्रथम क्रमांक मिळवून आपले कसब सिद्ध केले.
​यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांमधील ग्रुप डान्स स्पर्धेत इन्सुलीच्या ‘श्री देवी माऊली कला मंडळा’ने अत्यंत प्रभावी सादरीकरण करत द्वितीय क्रमांक पटकावला. तिरंगा प्रभाग संघाच्या महिलांनी मिळवलेले हे यश केवळ त्यांच्या वैयक्तिक मेहनतीचे नसून, ग्रामीण भागातील महिलांमधील संघटनशक्ती आणि आत्मविश्वासाचे उत्तम प्रतीक मानले जात आहे. या यशस्वी महिलांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.

​

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे