सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदांपैकी 14 पदे रिक्त
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात 19 मंजूर नियमित वैद्यकीय अधिकारी पदांपैकी 14 पदे रिक्त असल्याचे मान्य केले. त्याचवेळी डॉ. शंतनु तेंडुलक(M.D.Medicine), डॉ. धीरज सावंत, डॉ. भक्ती कुंभार यांच्यासह एकूण 25 वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळसेवा देत असल्याचा दावा कोल्हापूर सकिँट बेंच समोर प्रतिज्ञापत्राव्दारे केला.
कोल्हापूर सकिँट बेंच समोर आज बुधवारी सुनावणीसाठी तारीख होती. अभिनव फाऊंडेशन तफे दाखल जनहित याचिका प्रकरणी अभिनवचे वकील महेश राऊळ यांना आज आरोग्य विभागाचे प्रतिज्ञापत्र प्राप्त झाले. त्यात अनेक दावे आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने केले आहेत. आरोग्य सेवा नियमित पणे दिली जाते; ती प्रभावीत होऊ दिलेली नाही, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
रिक्त वैद्यकीय अधिकारी पदे भरण्यासाठी 27 फेब्रुवारी 2026 ला 1440 पद भरतीची राज्यस्तरावर जाहिरात प्रसिद्ध केली. त्यानुसार भरतीची कार्यवाही सुरु आहे.
मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल शासन आदेशानुसार 6 मार्च 2019 ला सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी मंजूर आहे. त्या जागेबाबत उच्च न्यायालयात व्दितीय अपील राजघराण्याच्या वतीने प्रलंबित आहे.त्या केसचा लवकर निपटारा व्हावा म्हणून उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान अभिनव फाऊंडेशनने सूचविलेल्या भटवाडी सावंतवाडी येथील पर्यायी जागेबाबत बांधकाम विभागाचा अहवाल प्राप्त आहे. यासंदर्भात सहाय्यक संचालक आयुक्तालय मुंबई यांचे मार्गदर्शन मागविले आहे. ते अद्याप प्राप्त नाही.
सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाच्या उपलब्ध जागेबाबत.ही बांधकाम विभागाचा अभिप्राय मागविण्यात आला. त्यामध्ये जुनी कुटीर रुग्णालय इमारत पाडून त्या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल बांधणे शक्य आहे, असे अभिप्राय आल्याचे पत्र बांधकाम विभागाने न्यायालयात सादर केले. रक्तपेढीतील रिक्त पदे, अधिकारी, कर्मचारी यांची रिक्त पदे, तसेच न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या अहवालावर कोणती ठोस कार्यवाही केली ते मात्र प्रतिज्ञापत्रातून आरोग्य विभागाने उघड केलेले नाही.


